मुंबई : मुंबईत यंदा पाणी तुंबण्याच्या जागा वाढल्या, पालिका प्रशासनाचे दावे पाण्यात
Continues below advertisement
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचं सत्ताधारी आणि प्रशासन छातीठोकपणे सांगतात. मात्र पहिला पाऊस झाला की हे दावे साचलेल्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतात. कारण यावर्षी मुंबईत पाणी साचण्याच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी महापालिकेने मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला जबाबदार धरलंय. 2014 पासून मुंबईत पाणी साचण्याच्या जागेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी हा आकडा 225 वर पोहोचलाय. यंदा प्रथमच हुतात्मा चौक, कफ परेड, जि.डी सोमानी मार्ग, फाईव्ह गार्डन आणि ताज हॉटेल समोरील परिसरात पाणी साचल्याचं बघायला मिळालं.
मुंबईत पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका दरवर्षी कोटयावधी रुपये खर्च करते. पण हे सर्व पैसे पाण्यातच जात असल्याचं सिद्ध होतं.
Continues below advertisement