मुंबई : हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई : माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे खासदार कुमार केतकरही उपस्थित होते.
अभय ठिपसे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्यात अनियमितता दिसत असून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींवर फेरविचार करायला हवा, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.