मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, उद्या अंत्यसंस्कार
Continues below advertisement
श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ अखेर शांत झालं आहे. दुबई सरकारनं श्रीदेवीच्या मृत्यूचं प्रकरण अखेर बंद केलं आहे. त्यामुळे 3 दिवसांपासून मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत असलेलं पार्थिव अखेर खासगी विमानातून भारताकडे रवाना झालंय.. दरम्यान श्रीदेवीच्या मृत्यूनंतर उठलेलं संशयाचं धूकं आता खाली बसलंय. हा मृत्यू घातपाती नसून बाथटबमध्ये अपघाती बुडूनच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबासोबत दुबईला गेल्या होत्या.
Continues below advertisement