मुंबई : नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवणार नाहीत?
Continues below advertisement
नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. पण वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
Continues below advertisement