Maharashtra cabinet expansion | मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं पंचांग नक्की कुणाकडे? | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचं पंचांग अद्याप आपल्यापर्यंत आलं नसल्याचं मोठं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांनाही अनभिज्ञ ठेवलंय का, असा सवाल आता विचारला जातोय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी या बैठकीनंतर बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर सध्या काही बोलू शकत नसल्याची प्रतिक्रिया उद्धव यांनी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Continues below advertisement