मुंबई : एलफिन्स्टन ब्रिज तातडीनं बांधण्यासाठी सैन्याची मदत, मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री पाहणी करणार

Continues below advertisement
मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली जाणार आहे.  आज मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी करायला येणार आहेत. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. कमीत कमी वेळेत किंवा तातडीच्या वेळी काम पूर्ण करायचं असल्यास अशा प्रकारच्या बांधकामांची जबाबदारी सैन्याकडे दिली जाते. याआधी कॉमनवेल्थ स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर सैन्यानं तो पूल लवकरात लवकर बांधून दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच अशाप्रकारचा पूल सैन्याकडून बांधला जाणार आहे. वारंवार पाठपुरावा केल्याचं हे फलित असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram