मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून योजनांची यादी, वडाळ्याचा बीकेसीप्रमाणे विकास
सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे मुंबईकरांचा वेग तर वाढणार आहेच. शिवाय रुपडंही बदलणार आहे. पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगावं उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे. याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. वडाळा-घाटकोपर-तीन हातनाका-कासरवडवली हा मेट्रोचा मार्ग होता आता तो पुढे गायमुखपर्यंत वाढवला जाणार आहे. आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.