मुंबई : सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी रद्द करा - सुप्रिया सुळे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज दिल्लीत होणाऱ्या GST काऊंसिल बैठकीच्या पार्श्वभूमीवर इकंडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं आहे. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलीय. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या GST भवन इथं राष्ट्रवादीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी जाहिरात बाजीवरुनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.