
मुंबई: ठाणे पालिका आयुक्तांना मोठा दिलासा
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. जयस्वाल यांच्याविरोधातील पोक्सोची याचिका हायकोर्टानं निकाली काढली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर एका याचिकेव्दारे करण्यात आला होता. या याचिकेतून जयस्वाल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. संबंधित मुलीकडून आयुक्त संजीव जयस्वाल बॉडी मसाज घेत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मात्र पीडीत मुलगी आणि तिच्या आईनं पोक्सो अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात सा-या आरोपांना नकार दिलाय.
Continues below advertisement