मुंबई: 1400 सफाई कर्मचाऱ्यांना 3 महिन्यात सेवेत घेण्याचे आदेश
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या चौदाशे सफाई कामगारांना
पुढच्या 3 महिन्यात सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
त्यामुळे या चौदाशे सफाई कामगारांना दिलासा मिळणार आहे.
हे सर्व कामगार मागील 12 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करत होते. या चौदाशे कामगारांना पडताळणी करून सेवेत रुजू करण्याचे आदेशही वर्षभरापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
मात्र या कामगारांच्या पूर्वी दिलेल्या नावात आणि आताच्या आधारकार्डच्या नावात किरकोळ स्पेलिंग मिस्टेक असल्यानं कामगारांना कायम करता येत नाही त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे अशी गोष्ट निदर्शनास आली होती.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आताच्या आदेशाचं पालन पुढच्या तीन महिन्यात होतं की पुन्हा लांबणीवर पडतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहेत.