
मुंबई : नाणार प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास राजीनाम्याची तयारी : सुभाष देसाई
Continues below advertisement
नाणार प्रकल्पाचा सामंजस्य करार झाल्याचं आपल्याला माध्यमांतून कळालं असं वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना दिली नव्हती. केंद्र सरकारनं हा निर्णय परस्पर घेतला असंही ते म्हणाले. दरम्यान शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध कायम आहे. तसंच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचं सूतोवाचही त्यांनी केलं.
Continues below advertisement