मुंबई : आता सुलभ हफ्त्यांवर कपडे खरेदी करा, मिंत्रा डॉटकॉमवर इएमआयची सुविधा
तुम्ही आता महागड्या गोष्टींप्रमाणं कपडेही इन्स्टॉलमेंट म्हणजे ईएमआयवर विकत घेऊ शकणार आहात. फॅशन जगतातली आघाडीची वेबसाईट मिंत्रा डॉट कॉमनं ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.. दर महिन्याला फक्त 51 रुपयांच्या हप्त्यावर तुम्ही ही खरेदी करु शकता. 1 हजार 300 रुपयांच्या पुढच्या कपड्यांच्या खरेदीवर ही सुविधा मिळणार आहे.