मुंबई : एलओयू, एलओसीच्या वापरावर रिझर्व्ह बँकेची बंदी
Continues below advertisement
रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्रातील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहेत. यापुढे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' जारी करण्यास सर्व बँकांना बंदी घालण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदीने केलेल्या ११ हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' वर बंदी घालून बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांच्या मुळावरच आरबीआयने घाव घातला आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे एक बँक दुसऱ्या बँकेला खातेदाराची हमी देते. ज्याद्वारे खातेदार कर्ज घेऊ शकतो.
Continues below advertisement