मुंबई : विश्वास पाटलांच्या एसआरए प्रकरणाच्या चौकशीची फाईलच गहाळ!
Continues below advertisement
मुंबई: माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडी करणार आहे. याप्रकरणातील 137 पैकी 33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं आहे, असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितलं.
मात्र महत्त्वाचं म्हणजे विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाली आहे, अशी धक्कादायक माहिती रवींद्र वायकर यांनी दिली.
याबाबत निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
याप्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.