माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची शिवसेनेत घरवापसी
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्घव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आपल्या समर्थकांसह त्यांनी सेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शिवसेनाप्रवेशाच्या चर्चा होत्या. 2012 साली रवींद्र माने यांनी शिवसेनेशी फारकत घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या रुपानं राष्ट्रवादीला मोठी ताकदही मिळाली. एका कार्यक्रमात राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मानेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. त्या हाकेला ओ देत मानेंनी अखेर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Continues below advertisement