मुंबई | अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी नॅशनल पार्कची ब्रँड अंबेसिडर
बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कची ब्रँड अंबेसिडर म्हणून अभिनेत्री रविना टंडनची नियुक्ती करण्यात आलीय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक सुविधांचे उदघाटन केले. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कच्या अधिकृत संकेतस्थळाचं अनावरणही करण्यात आलं. नॅशनल पार्क प्रदूषण मुक्त राहावं यासाठी बॅटरीवर धावणाऱ्या बग्गीचे उद्घाटन करण्यात आलंय.