Sharad Pawar vs ED | शरद पवारांना पोलिसांकडून ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती | मुंबई | ABP Majha
नोटीस नसतानाही कथित शिखऱ बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे...शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांवर ईडीनं गुन्हा दाखल केलाय...दरम्यान आज सकाळीच मुंबई पोलिस बॅलार्ड इथल्या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहचले...सहाय्यक आयुक्त विनय चौबे यांनी पवारांना ईडी ऑफिसकडे न जाण्याची विनंती केली...पवारांच्या ईडी ऑफिसकडे जाण्यानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पोलिसांनी म्हटलंय...राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवलीय...कार्यकर्त्यांवर ड्रोनच्या मदतीनं नजर ठेवण्यात येतेय...दरम्यान पवारांबरोबर ईडी कार्यालयाकडे जाणारच असं नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.