मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलला पक्षाचं शक्तीप्रदर्शन, बीकेसीवर जय्यत तयारी

Continues below advertisement
2019 च्या तोंडावर मुंबईत भाजपनं जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. परवा म्हणजे ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर वांद्रेतल्या बीकेसीत भाजपनं महामेळावा आयोजित केला आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून राज्यात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी शिवसेनेनं दसरा मेळावा आणि त्यानंतर गुढीपाडव्याला मनसेनं मेळावा घेत आगामी निवडणुकांची पूर्वतयारी सुरु केली. भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विशेष उपस्थितीत पक्षाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. 6 एप्रिलला सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा भाजपचा दावा आहे. याशिवाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यासाठी जातीने लक्ष घातलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram