मुंबई : छोट्या दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्यास मुभा : रामदास कदम
Continues below advertisement
अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेतला आहे. किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे.
ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्यात आला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली.
ग्राहकांना प्लास्टिक पिशवी वापरण्यासाठी बंदी आहे. मात्र किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी हा निर्णय असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
दरम्यान, अटी-शर्तींसह बंदी उठवण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.