मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या उद्याच्या रॅलीला पोलिसांचा परवानगी नाही, आंदोलनाची मात्र परवागनी
Continues below advertisement
आमची अपेक्षा होती एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडेंना अटक होईल, पण सरकारकडून हालचाल नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, सरकारने लोकशाहीचा गळा दाबला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारल्याची टीकाही त्यांनी केली.
मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली आहे. त्यांना आता रोखणं कठीण आहे. त्यामुळे उद्या आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथं काय तो निर्णय होईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घालतात. ज्यांनी मारलं त्यांना मोकाट सोडलं. सैतानाला पाठीशी घालायचं आणि सावाला मारायचं, अशी सरकारची भूमिका असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर केली.