Raju Shetti Meets Raj Thackerey | राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान हातकणंगले मतदारसंघात सभा घेतली होती. त्यामुळे आपण राज यांची सदिच्छा भेट घेतल्याचं शेट्टी म्हणाले. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देणं शेट्टींनी टाळलं. दरम्यान, जनतेचा कौल स्वीकारला आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचंही शेट्टींनी सांगितलं.
Continues below advertisement