मुंबई : चलन तुटवड्यावर लवकरच तोडगा काढू, एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांची माहिती
देशातील 9 राज्यांमध्ये चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातही पाहायला मिळते आहे.
आम्ही मुंबईसह चंद्रपुर आणि अमरावतीमध्ये एटीएमचा रियालिटी चेक केला. यामध्ये शहरासह उपनगरातल्या बहुतेक एटीएम सेंटरमध्ये खडखडाट पाहायला मिळाला. कुठे रोकड संपल्याचे फलक लावले आहे, तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचं कारण लिहण्यात आलंय. त्यामुळं ग्राहकांची मोठी तारांबळ झालेली पाहायला मिळते आहे. तर तिकडे अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही, एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी सुरु केली आहे. एटीएममध्ये पैसे का नाही, याचं कारणंही नागरिकांना कळत नसल्यानं त्यांची मोठी धांधल उडताना पाहायला मिळते आहे.