
मुंबई : रजनीकांत यांच्या पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला
Continues below advertisement
दाक्षिणात्य चित्रपटांचा महानायक रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आज सकाळी लता या कृष्णकुंजवर दाखल झाल्या. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर लता यांनी राज आणि शर्मिला ठाकरेंशी संवाद साधला.
Continues below advertisement