मुंबई : प्लास्टिकला पर्याय मिळेपर्यंत एक रुपयाचाही दंड भरु नका, राज ठाकरेंचं आवाहन
Continues below advertisement
प्लॅस्टिक बनवणाऱ्या कंपन्यांकडून आगामी निवडणुकीत फंड हवा म्हणून प्लॅस्टिकबंदी केली गेली नाही ना.. अशी शंका उपस्थित करुन राज ठाकरेंनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयावर गंभीर आरोप केला. मुंबईत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही काळानंतर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय केराच्या टोपलीत जाऊन सर्व काही पूर्ववत होईल, असा दावाही त्यांनी केला. शिवाय जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.. आणि एवढ्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त एखाद्या खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement