MNS | विधानसभेला मनसे 150 जागा स्वबळावर लढणार ? मुंबईत आज इच्छुक उमेदवारांचा मेळावा | ABP Majha
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर 150 जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितलंय. तरी, आज मुंबईतल्या वांद्र्यातील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा होणार आहे. त्याला मनसे नेते, सरचिटणीस आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आपल्या भाषणात काय भूमिका मांडतात आणि निवडणूक लढवण्याबाबत काय घोषणा करतात, हे पाहणं महत्वाचं आहे.