मुंबई : सरकारला खड्डे दिसत नसतील तर आंदोलन दिसेल - राज ठाकरे
Continues below advertisement
सायन-पनवेल महामार्गाची रस्त्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता मनसेनं तुर्भे इथल्या पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या तोडफोडीचं समर्थन केले आहे. राज ठाकरेंनी तुर्भेतील पीडब्लूडीच्या कार्यालयाच्या तोडफोडीचं समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काळात मनसैनिक खड्डेविरोधी आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्याची शक्यता वाढली आहे.
Continues below advertisement