मुंबई : मुलांना परीक्षेला बसवू नका, सीबीएसई परीक्षांबाबत राज ठाकरेंचं पालकांना खुलं पत्र
राज्यातल्या सीबीएसई बोर्डाच्या फेरपरीक्षेला पालकांनी पुन्हा आपल्या मुलांना बसवू नये, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनियता बाळगता येत नसेल तर त्यामध्ये विद्यार्थ्याचा दोष काय? आणि सरकारच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांनी मनस्ताप का सहन करावा, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर फुटला. यानंतर कुणाचंही नुकसान होऊ नये म्हणून बोर्डानं हा पेपर पुन्हा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र या निर्णयावर टीका होऊ लागली आहे.