मुंबई : झेपत नसेल तर पायउतार व्हा, मराठा मोर्चावरुन राज ठाकरेंचा सरकारला इशारा
Continues below advertisement
झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण कसं असेल, कायद्याच्या कोणत्या चौकटीत दिलं जाईल, अशा सर्व बाबींवर भूमिका मांडा, नाहीतर उगाच आशा लावून लोकांचे जीव घेऊ नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केलं आहे. तसंच मराठा आंदोलकांनाही शांततेचं आवाहन करत आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका, असंही राज यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement