मुंबई :' गावाकडच्या गोष्टी'मधले कलाकार 'कृष्णकुंज'वर, राज ठाकरेंशी गप्पा
Continues below advertisement
एबीपी माझाने दाखवलेली 'केळेवाडी टू जोहान्सबर्ग' या बातमीची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'गावाकडच्या गोष्टी' या वेब सीरिजच्या सर्व कलाकारंची भेट घेतली. ग्रामीण भागात युट्युब सारख्या माध्यमाचा वापर करत 'गावाकडच्या गोष्टी' या वेब सीरिजच्या कलाकारांनी चांगला रोजगार उपलब्ध केला आहे. वेब सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि कथानक यांना अक्षरश: सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यांच्या याच कामाची दखल दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील मराठी मंडळाने देखील घेतली आहे. मराठी मंडळांने त्यांना जोहान्सबर्गला वेब सीरिजचा एक एपिसोड शूट करण्यासाठी निमंत्रित केलं आहे.
Continues below advertisement