मुंबई : राज ठाकरेंनी वाढदिवशी नाणार प्रकल्प, ईव्हीएमचा केक कापला

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज पन्नासावा वाढदिवस. यानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. सकाळपासून केक घेऊन अनेक कार्यकर्ते दाखल होत आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारचा निषेध करत काही जणांनी ईव्हीएम मशिनचा केक आणला, तर कोणी नाणारच्या नकाशाचा केक आणला आहे. बर्थडेनिमित्तानं मनसेतर्फे आज काही पेट्रोलपंपांवर चार रुपये स्वस्त दरानं पेट्रोल देण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram