मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद

Continues below advertisement

मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

“इथे लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram