मुंबई | राज कपूर यांच्या पत्नीचं निधन, बॉलिवूड शोकाकूल
दिवंगत बॉलीवूड अभिनेते राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांच आज पहाटे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या सतत आजारी होत्या. 1946 मध्ये राज कपूर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रितू नंदा आणि रिमी जैन ही त्यांची 5 मुलं. कृष्णा यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण कपूर परिवार त्यांच्या राहत्या घरी जमा झाला. आणि तिथं कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.