712 | अहमदनगर | दूध दरात कपात केल्यास आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
अहमदनगरमधील अकोले तालुक्यात नुकतीच ऊस आणि दूध परिषद पार पडली. ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्य़ांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आय़ोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित होते. नुकताच सरकारनं गायी आणि म्हशीच्या दुधात २ रुपयांची कपात जाहीर केली. सरकारच्या या निर्णयावर राजू शेट्टी यांनी जोरदार टिका केली. दूध दरात आणखी कपात केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.