मुंबई पाऊस: दादरच्या प्लाझा पुलावर मोठी वाहतूक कोंडी, सायनमध्ये गांधी मार्गेट पाण्याखाली

Continues below advertisement
सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबई आणि उपनगरांना झोडून काढलंय.
परिणामी हिंदमाता, कलानगर, महालक्ष्मी, एस.व्ही.रोड, इर्ला, पार्ले, सायन, किंग्ज सर्कल, वडाळ्यात पाणी साचलंय. त्यामुळे बहुतेक खासगी शाळांनी आज सुट्टी जाहीर केलीय.
शिवाय दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाडसह तिकडं ठाणे आणि नवी मुंबईतही संततधार कायम आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एरवी 4 महिन्यात जितका पाऊस पडतो, त्याच्या 54 टक्के पाऊस गेल्या 20 दिवसात पडलाय.
त्यामुळे मुंबईच्या आसपासची धरणंही भरु लागली आहेत. दरम्यान तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा तब्बल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतायत.
तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram