मुंबई : मुंबईत पाणी साचलंच नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वर धृतराष्ट्राच्या भूमिकेत
Continues below advertisement
रविवारपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं. पण मुंबईचे महापौर विश्ननाथ महाडेश्वर मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. कारण त्यांना मुंबईत कुठेही पाणी साचल्याचं दिसलं नाही. खरं तर सकाळपासून रस्ते, रेल्वे ट्रॅक घरातही पाणी शिरलं मात्र यंदा महापालिकेनं चांगलं काम केल्यामुळे पाणी साचलं नसल्याचा दावा विश्वनाथ महाडेश्वरांनी केला आहे. त्यामुळे आता महापौरांना उघडा डोळे, बघा नीट असं म्हणण्याची वेळ आली आहे.
Continues below advertisement