मुंबई: रायगडावरील मेघडंबरीतील फोटोवरुन टीका, रितेश देशमुखचा माफीनामा

Continues below advertisement
मराठमोळा बॉलीवूड अभिनेता रितेश देशमूख शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबतच्या सेल्फीमुळं वादात सापडला आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि साहित्यिक विश्वास पाटील यांनी फोटो काढले. शिवाय छत्रपतींसोबतचा एक सेल्फीही रितेश देशमुखनं ट्वीट केला. जो दिग्दर्शक रवी जाधवनंही रिट्विट केला. मात्र यानंतर शिवप्रेमींकडून याला कडाडून विरोध झाला. अनेकांनी रितेशवर अतिशय कडक शब्दात टीका केली. यानंतर रितेशनं शिवप्रेमींची माफी मागत हा फोटो सोशल अकाऊंटवरुन हटवला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram