मुंबई : पैलवान राहुल आवारेला उद्धव ठाकरेंकडून 11 लाखांचं बक्षीस
Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘मातोश्री’वर राहुल आवारेच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून राहुल आवारेला 11 लाख रुपयांची मदत दिली. उद्धव ठाकरेंच्या हस्तेच आर्थिक मदतीचा धनादेश राहुलला सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार तानाजी सावंत, विश्वनाथ नेरुरकर, संजय नटे, सुरेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.
29 तारखेला शरद पवार यांच्या वतीने राहुल आवारेचा सत्कार झाला. त्यावेळी राहुलला पवारांकडून 12 लाखांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. याच कार्यक्रमात राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे हे उपस्थित होते. दिलीप कांबळेंनी या कार्यक्रमात सांगितले की, “राहुल आवारे याला शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की केले आहे.” त्यामुळे राहुल आवारे डीवायएसपी होणार हे निश्चित झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.