मुंबई : वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार निवृत्त, पण सरकारकडून एक वर्षाची मुदतवाढ

Continues below advertisement
वादग्रस्त सनदी अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार हे शासकीय सेवेतून बुधवारी निवृत्त झाले. मात्र, राज्य सरकारने त्यांची पुन्हा त्याच पदावर एका वर्षासाठी नियुक्त केली आहे. ही नियुक्ती 1 मार्च 2018 पासून करारपद्धतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग, तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पातील जमीन संपादनाची कामे अंतिम टप्प्यात असल्याने, ती पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची करारपद्धतीने नियुक्त करत असल्याचे शासनाने या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मोपलवार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. यामध्ये मोपलवार हे बोरीवलीतला एक शासकीय भूखंड बिल्डरला स्वस्तात देण्यासाठी लाच मागत असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच ‘समृद्धी’ महामार्गालत त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. या दोन्ही प्रकरणात मोपलवार यांना क्लीन चीट मिळाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram