मुंबई : पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

Continues below advertisement
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस होत असलेल्या पावसानं ट्रॅक पाण्याखाली गेलाय.  आणि मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या उंबरगावजवळ अडकून पडल्यात.. ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विरार ते बोरीवलीदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे इकडे मानखुर्दमध्ये पाणी साचल्यामुळे  वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची वाहतूक बंद झाली होती, मात्र आता सुरू करण्यात आली आहे..  वाशीसध्या टॅकवर 460 मिमी पाऊस साचला आहे. वसई नालासोपारा नायगांवतील काही भागात सकाळी सात वाजल्यापासून बत्ती गुल झाली आहे. वसईच्या पुर्वेकडील  १०० केव्ही एक्स्ट्रा हाई वोल्टेज क्षमतेच्या सबस्टेशन मधील कंट्रोल रूममध्ये पावसाचं पाणी शिरलंय.. विरार, नालासोपाराबरोबर वसईतही मोठा पाऊस होतोय. वसईतला सनसिटी भागात प्रचंड पाणी साचलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram