रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काम हाती घेतलं जाणार आहे. उद्यापासून म्हणजे 6 फेब्रुवारीपासून ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने हे काम केलं जाणार आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक दर पंधरा मिनिटांनी टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल.

दरड कोसळणाऱ्या क्षेत्रातील दगड काढण्याचं काम या काळात केलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने प्रवास करणार असाल, तर याबाबत माहिती असणं आवश्यक आहे.

भातण बोगदा, आडोशी बोगदा, खंडाळा बोगदा आणि अमृतांजन बोगदा परिसरातील दगड काढण्याचं काम केलं जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola