VIDEO | मुंबई-पुणे डेक्कन क्वीनचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार | मुंबई | एबीपी माझा
डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. डेक्कन क्वीनचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. त्यामुळे दररोज ट्रेनने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नोकरदारांचा वेळ वाचणार आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश रेक वापरण्यात येणार आहे. यामधील 'पुश अँड पुल' तंत्रज्ञानामुळे दोन्ही शहरांमधील अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे. पुढील काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता आहे. डेक्कन क्वीन ही सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसनंतर लिंक होमन-बुश रेक पद्धत वापरणारी मध्य रेल्वेवरील दुसरी ट्रेन ठरणार आहे. पुश अँड पुल टेक्निकमध्ये पुढे आणि मागे असे दोन लोकोमोटीव्ह असतात, यामुळे ट्रेनला स्थैर्य येतं. वळणांवर गती कमी-जास्त करण्यात लागणारा वेळ आणि हिसके यामुळे कमी होतात.