मुंबई-पुणे : सुवर्ण पदकविजेते राहुल आवारे, मधुरिका पाटकरचं जंगी स्वागत
Continues below advertisement
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कमाई करणारा पैलवान राहुल आवारे आणि सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणाऱ्या मधुरिका पाटकरचं आज जंगी स्वागत करण्यात आलं. मधुरिका आणि पूजा सहस्रबुद्धे या जोडीनं गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदाची कमाई केली होती. तर राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली.
Continues below advertisement