मुंबई : खाण्याचा आणि न खाण्याचा बर्फ ओळखण्यासाठी खास निर्णय

Continues below advertisement
आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची बातमी... उसाचा रस, शितपेय तसंच अनेक खाद्य पदार्थांमध्ये बर्फाचा सर्रास वापर होतो. मात्र तो बर्फ खाण्यासाठी योग्य आहे का, असा सवाल आपल्याला कधीतरी पडला असलेचं.  मात्र, यापुढे खाद्य बर्फ आणि अखाद्य बर्फ अशी प्रतवारी करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलाय.
अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिकट निळा रंग वापरण्यात येणार आहे.  खाद्य बर्फ मात्र पिण्यास योग्य पाणी वापरून पारदर्शक ठेवला जाईल. मासे, मटण अशा विविध पदार्थांच्या साठवणीसाठी अखाद्य बर्फ वापरला जातो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram