मुंबई : विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत असा गलथानपणा झाला नाही : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीय. मात्र पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन गदारोळ बघयाला मिळाला. यावेळी आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. या प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारला विधानसभेत घेरलं. विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत असा गलथानपणा कोणत्याही सरकारने केला नाही. हा सदनाचा अपमान असल्याचं त्यांनी विधानसभेत म्हटलं.
Continues below advertisement