मुंबई : सरकारी मुखपत्र लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांऐवजी विलासराव देशमुखांचा फोटो
Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड' एका चुकीमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या विशेष अंकात डॉ. आंबेडकर यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लहानपणीचा फोटो छापल्याने सोशल मीडियातून सरकारचे वाभाडे काढले जात आहेत. आंबेडकरी अनुयायी आणि विचारवंतांनी या अक्षम्य चुकीबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाचे मुखपत्र असलेल्या या चारही भाषेतील मासिकांचे कंटेंट आणि प्रकाशन शासनाच्या माहिती विभागाकडून केलं जातं. त्या माहिती विभागाला डॉ. बाबासाहेब यांची प्रतिमा माहित नसणे ही खेदाची बाब आहे, असं अभ्यासकांचं मत आहे. सरकारच्या प्रसिद्धीवर आणि विशेषतः जाहिरातबाजीवर केला जाणाऱ्या खर्चावरुन माहिती विभाग याआधीही चर्चेत आलं होतं. आता या गंभीर चुकीमुळे पुन्हा एकदा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.