हैदराबाद: ट्रेनसमोर सेल्फी घेताना अपघात नव्हे, 'तो' निव्वळ प्रँक व्हिडिओ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हैद्राबादमध्ये ट्रेनसमोर सेल्फी घेताना एका तरुणाचा अपघात झाल्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात देशभर चर्चेचा विषय बनला होता.
या तरुणाचं नाव शिवा असून तो जिम इन्स्ट्रक्टर आहे, आणि त्याचा सेल्फीचा शौक कसा अंगाशी आला याच्या सुरस कहाण्या टीव्ही आणि वर्तमानपत्रातही पाहायला मिळाल्या. इतकंच नव्हे तर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचंही सांगण्यात आलं.
मात्र हा सगळा प्रकार आता बनावट असल्याचं समोर येतंय. कारण त्यानं फक्त खाली पडल्याचं नाटक केलं होतं, असं आता समोर येतंय. कारण शिवाचा सुखरुप असल्याचा आणि त्यांनी लोकांची मजा घेतल्याचा दुसरा व्हिडीओ ट्विटरवर समोर आलाय, आणि कानडी न्यूज चॅनल्सनी त्याच्या बातम्याही केल्यात.