मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून संभाजी भिडे गुरुजींना क्लीनचिट, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणात संभाजी भिडे आरोपी असल्याचा एकही पुरावा न मिळाल्यानं त्यांना अटक करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही फ़डणवीसांनी दिलं आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी आणखीही काही पुरावे सादर केलेत, त्यानुसार चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी सरकारला पुन्हा धारेवर धरलं आहे.
Continues below advertisement