Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं | ABP Majha

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रदीप शर्मांना शिवबंधन बांधलं. प्रदीप शर्मा यांना नालासोपारा किंवा अंधेरी मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी शर्मा यांच्या रुपात शिवसेना सज्ज झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित होताच विरारमध्ये शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोष केला आहे. विरार पूर्व मनवेल पाडा तलावा शेजारील मातोश्री संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी जल्लोष केला. सायंकाळी सहा वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शर्मा अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola