मुंबई : टपाल खात्याकडून गुंतवणूकदारांवर बचत खात्यांची सक्ती

Continues below advertisement
टपाल खात्याच्या विविध योजनांत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना आता ही गुंतवणूक काढून घेणे कठीण बनले आहे. मुदत समाप्तीनंतर गुंतवणूक काढू इच्छिणाऱ्यांना धनादेशाद्वारे परतावा देणे टपाल कार्यालयाने बंद केले आहे. त्याऐवजी ग्राहकांना टपाल कार्यालयात बचत खाते सुरु करण्याची सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे, गुंतवणुकीचा परतावा या खात्यात वळता झाल्यानंतर ती संपूर्ण रक्कम ग्राहकाला काढता येते. त्यामुळे एकदाच संपूर्ण रक्कम काढल्यानंतर हे खाते ‘मृत’ बनते. अशा वेळी बचत खात्याची सक्ती कशासाठी, असा सवाल गुंतवणूकदार विचारत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram