मुंबई : कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर छापे
पुणे, मुंबई आणि नागपुरात कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. नागपुरात अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरु होती. तर मुंबईत सुधीर ढवळे आणि हर्षाली पोतदारांच्या घरी पोलीस तपास करत आहेत. सरकारची ही कारवाई सूडबुद्धीने सुरु असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे